न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा
डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती
गंजदार पांढर्या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्या शांततेचा निशिगंध
या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा
कवी - बा. सी. मर्ढेकर
अशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.
कविता शोध
माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.
आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/
आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/
Friday, May 23, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
12 comments:
वा..काय सुंदर कविता आहे ही. कधी वाचनात आलेली नव्हती आजपर्यंत...मात्र मुंबापुरी आणि गोड हिवाळा हे गणित जमत नाही फारसं नाही...
comment बद्दल धन्यवाद सोनल. खरं आहे तुझं म्हणणं, आता मुंबई आणि गोड हिवाळा यांचा मेळ आजिबात बसत नाही. कदाचित जेव्हा मर्ढेकरांनी ही कविता लिहीली तेव्हा जरा वेगळी परीस्थिती असेल. पण ही कविता मात्र लाजवाब आहे आणि माझ्या सर्वात आवडत्या कवितांपैकी एक आहे.
hi sonal , hi amit
Amit mhanto te barobar aahe. pan he khara nahi ki atta he rup pahayla milat nahi. agdich milat nasel pan kahi thikani hivalyatli pahat ashich hote.
amhala 8th ki 9th la hi kavita hoti. kiti cchan varnan kela aahe mumbaicha. garbhavati stree nhahun alyanatar sunder diste.
hi kavita mazhya avdtya kavitanpaiki ek ahe
Amit,
Thanks for uploading ...
hi..........ya kavitemule punascha ekda shalechi athvan zali.............you really have excellent collection.........thanks a lot for uploading all these poems........
he kavita marathi mediumla 10 v chya abhyaskramat hoti. mardhekarani tya kalchya mumbapurich varnan kelay.dnt compare with now..this is 1 of the great poem by him
It remebers my school day..and it feels ki; mi suddha ya hivala madhala muba-puricha ek hissa aahe"
ग्रेट कविता!
"मात्र मुंबापुरी आणि गोड हिवाळा हे गणित जमत नाही फारसं नाही"
That's exactly the point! म्हणूनच शेवटचं कडवं.
ही कविता 10 ला होती मला सर्वात जास्त आवडते
mumbaiachya ह्या रुपाची कलपना करावी जेने करुन मनाची भरारी कळेल
आम्हांला मराठीच्या पुस्तकात होती.खूपछान आहे
आम्हांला मराठीच्या पुस्तकात होती.खूपछान आहे
Aaj achanak aathavli. Net var search keli aani ithe milali. mastach aahe. thank you for uploading.
Post a Comment