कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Tuesday, November 4, 2008

शिल्पकार

झेलावयास माझी छाती तयार आता
घाला नव्या दमाने तुमचे प्रहार आता

मी एकटाच गातो या उत्सवात माझ्या
माझ्याच गायकीवर माझी मदार आता

विझलो जरी कितीही, मी संपणार नाही
हृदयातल्या आगीशी माझा करार आता

गावात चोरटयांच्या दिवसा प्रकाश नाही
तो सूर्यही जरासा झाला हुषार आता

नाही आता उदासी, नाही आता निराशा
माझ्याच जीवनाचा मी शिल्पकार आता


कवी - प्रसाद शिरगांवकर

4 comments:

आशा जोगळेकर said...

फारच छान . तुमची कवितांची निवड नेहेमीच छान असते.

अमित said...

धन्यवाद, मराठीत अप्रतिम कवितांची काहीच कमतरता नाही. फ़क्त शोधण्याची ईच्छा हवी. :)

मी चांगल्यात चांगल्या कविता ईथे ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय, बघुयात कधीपर्यंत जमतं ते.

arjun said...

धन्यवाद अमित खूप सुंदर कविता जमा केलेल्या आहेत।

arjun said...

धन्यवाद अमित।
खूप छान छान कविता जमा केलेल्या आहेत।