पावसाच्या धारा येती झरझरा
झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ
ढगावर वीज झळके सतेज
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज
झोंबे अंगा वारे काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली पाखरें
हर्षलासे फार नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून खार
डोईवरी मारा झाडांचिया तळी
गुरे शोधिती निवारा
नदीलाही पूर लोटला अपार
फोफावत धावे जणू नागीणच थोर
झाडांची पालवी चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें रंगदार छबी
थांबला उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश
किरण कोंवळे भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें वस्तुजात खुले
सुस्नात जाहली धरणी हासली,
वरुणाच्या कृपावर्षावाने संतोषली
कवयित्री - शांता शेळके
(Ashwinis-creations ने सुचवल्यानुसार ही कविता इथे टाकत आहे. पण कवितेचे शब्द अगदी तसेच्या तसे आहेत की नाही ते पहाण्यासाठी मुळ कविता न सापडल्याने मला जशी आठवली आणि मित्रांनी जे बदल सांगितले त्यानुसार इथे लिहीली आहे. आपणास जर कवितेत मुळ कवितेपेक्षा काही वेगळे आढळल्यास कळवा, त्यानुसार बदल करायला मला नक्कीच आवडेल.)
अशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.
कविता शोध
माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.
आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/
आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/
Subscribe to:
Post Comments (Atom)
7 comments:
थॅंक्यू अमित, माझ्या फार हळुवार आठवणी या कवितेशी निगडित आहेत. माझ्या बाबांनी शिकवली होती ही कविता मला. दुसरीत असतांना. कवितेशी नातं जडलं ते तेव्हापासूनच.
आताही ही कविता वाचतांना त्यांचीच आठवण येतेय.
काही काही ओळी, उदा:
डोईवरी मारा झाडांचिया तळी
गुरे शोधिती निवारा
अपूर्ण वाटतात का?
हो
... डोईवरी मारा
झाडांचिया तळी गुरे शोधिती निवारा
आणि
पानोपानी खुलतसें रंगदार छबी
... थांबला उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश
ह्या ओळी अपूर्ण वाटल्या, पण आमच्यापैकी कोणालाच त्या पूर्ण आठवल्या नाहित, म्हणून मग तशीच post केली आहे. कदाचित भेट देणा-यांपैकी कोणाला माहिती असतील तर त्या पूर्ण करता येतील.
पावसाच्या धारा डोईवर मारा !
झाडांचिया तळी गुरे शोधिती निवारा !!
थांबला पाऊस, उजळे आकाश !
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश !!
"वरुणाच्या कृपावर्षावाने संतोषली" या ओळ ऐवजी मूळ कवितेत "देवाजीच्या करणीने मने संतोषली" अशी ओळ आहे. आपण
मूळ कवितेत बदल करून मूळ कवितेतील भाव बदल करून टाकलात साहेब. खरे तर हि कविता मला ४४ वर्षापूर्वी इयत्ता २ री
ला होती.आजही ती पाठ आहे.
खरोखर जुन्या शाळेतल्या आठवणी जागवल्या...
शेवटची ओळ
देवाजीच्या करणीने मनी संतोषली ..
अशी आहे .
त्यातली देवाजीची हा शब्द एकदम चपखल
या ओळी अशा आहेत
पावसाच्या धारा, डोईवरी मारा
झाडांचीया तळी गुरे शोधती निवारा
Post a Comment