कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Wednesday, September 10, 2008

या बाळांनो, या रे या

या बाळांनो, या रे या
लवकर भरभर सारे या

मजा करा रे मजा करा
आज दिवस तुमचा समजा
स्वस्थ बसे तोचि फसे;
नवभूमी दाविन मी,
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया

खळखळ मंजुळ गाती झरे,
गीत मधुर चहुबाजु भरे
जिकडे तिकडे फुले फळे,
सुवास पसरे, रसही गळे.
पर ज्यांचे सोन्याचे
ते रावे, हेरावे.
तर मग कामे टाकुनिया
नवी बघा या ही दुनिया


कवी - भा. रा. तांबे

3 comments:

मन कस्तुरी रे.. said...

मस्त! चौथीत होती का आपल्याला ही कविता...?
आमच्या निंबाळकर बाई आठवल्या....

तुम्हाला "पावसाच्या धारा येती झरझरा , झाकळले नभ सोसाट्याचा वारा....?

मिळेल का कुठे?
मी फार दिवसांपासून शोधत आहे.

अमित said...

हो, शाळेत असताना ही कविता होती. परवा घरुन परतत असताना बसमध्ये एका लहान मुलीला कविता म्हणताना पाहिलं आणि जुन्या कविता post करायचं डोक्यात आलं. जेवढ्या आठवतील, सापडतील तेवढ्या कविता नक्की टाकेन.

पावसाच्या धारा येती झरझरा , झाकळले नभ सोसाट्याचा वारा....? शांता शेळकेंची आहे बहूतेक, पण पूर्ण आठवत नाहिये, उद्या मित्रांकडून confirm केल्यावर टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन.

Happy blogging and Keep Visiting. :)

Unknown said...

पंख पाचूचे मोरांना,
टिपती पाखरे मोत्यांना,
पंख फडकती घोड्यांना ,
मौज दिसे हि थोड्यांना ,
चपळ गती , हरीण किती
देखावे देखावे
तर मग कामे टाकुनिया
नवी बघाया हि दुनिया