कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Monday, December 3, 2007

तू तेव्हा तशी

तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी
तू बहराच्या, बाहूंची

तू ऐलराधा, तू पैल संध्या
चाफेकळी प्रेमाची

तू नवी जुनी, तू कधी कुणी
खारीच्या गं डोळयांची

तू हिरवी कच्ची, तू पोक्त सच्ची
तू खट्टी मिठ्ठी ओठांची

कवी - आरती प्रभू [
चिं. त्र्यं. खानोलकर]

2 comments:

प्रशांत said...

आरतीप्रभु कवयित्रीचं नाव नाही. ते एक महान कवी होते. कृपया दुरुस्ती करा.

अमित said...

माहिती बद्दल धन्यवाद प्रशांत.
दुरुस्ती केली आहे.