(चाल - रेशमाच्या रेघांनी)
रेशमियाच्या गाण्यांनी
भुंकणाऱ्या प्राण्यांनी
कर्ण माझा कसा की हो फोडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला.
नवी कोरी कॉपी सुफ़ी साजाची
'टोपी' चढवली रिमिक्स बाजाची
बाजाची हो बाजाची
माईक आडवा ऐटीमध्ये, तोंडाजवळ ओढीला
हात नका लावू त्याच्या सीडीला.
गात जाई प्रत्येक गाणे नाकात
रसिकांच्या उठते तिडिक डोक्यात
डोक्यात हो डोक्यात
चुंबनखोर इम्रानहाश्मी, आणिक असतो जोडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला.
कृपा त्याच्यावर सल्लूमियाँची
बाजारात चलती आज कचऱ्याची
कचऱ्याची हो कचऱ्याची
काय म्हणू देवा देवा, जनतेच्या आवडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला.
फायदा एक दिसतो त्याच्या गाण्यात
गाढवही गाते वाटे सुरात
सुरात हो सुरात
न्यूनगंड कित्येकांचा, दूरदेशी धाडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला।
कवी - मिलिंद छत्रे
[माहितीबद्दल धन्यवाद, मिलिंद]
4 comments:
फारच छान. अन् विचार ही जणु माझेच.
नमस्कार
हे विडंबन मी केले आहे.
माझ्या ब्लॊग वर ते वाचायला मिळेल
http://milindchhatre.blogspot.com/2007/06/blog-post_18.html
कृपया माझा नामोल्लेख कराल का?
आभारी आहे
-- मिलिंद छ्त्रे
@मिलिंद
नक्कीच, का नाही, आपले नाव लिहीण्यात आले आहे. blog ला भेट दिल्याबद्द्ल आणि ही माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद.
आपल्याला मी ईथे दिलेल्या आणखी काही कवितांबाबत आणखी माहिती असेल तर कृपया ती सुद्धा कळवा, ती सुद्धा ईथे टाकायला आवडेल मला.
Apratim.. sundarach
Post a Comment