कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Tuesday, December 8, 2009

गणपत वाणी

गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;

मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भूवयी,
भिरकावुनि ती तशीच द्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी.

गिर्‍हाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्यें गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;

स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.

गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते.

काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली.

काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.

गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला!

कवी - बा.सी.मर्ढेकर

3 comments:

अनामिक said...

मित्रा, ह्या कवितेबद्दल खूप धन्यवाद. शाळेत असताना स्वभाववोक्ती अलंकाराचं उदाहरण म्हणून माहित असलेली हि कविता फक्त सुरवातीच्या दोन कडव्यापुरतीच लक्षात राहिली होती. हि पुर्ण कविता वाचून खरंच खूप आनंद झाला. धन्यवाद!

-अनामिक

अनामिक said...

मित्रा, ह्या कवितेबद्दल खूप धन्यवाद. शाळेत असताना स्वभाववोक्ती अलंकाराचं उदाहरण म्हणून माहित असलेली हि कविता फक्त सुरवातीच्या दोन कडव्यापुरतीच लक्षात राहिली होती. हि पुर्ण कविता वाचून खरंच खूप आनंद झाला. धन्यवाद!

-अनामिक

sanket kalbhor said...

June diwas aathavle..
1Ch number..