अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात
धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी
मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा
जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव
जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान
काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा
कवी - कुसुमाग्रज
धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी
ReplyDeletehttp://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/107.htm
धगधगता -> correct
समराच्या ज्वाला या * देशाकाशी *
* मृत्युंजय *
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान
ReplyDeleteसफल जाहले तुझेच हे रे, *तुझेच* बलिदान .
'तुझे' breaks the metre.
मराठी ... एक असा शब्द जिथे सारे शब्द फिके पडतात...विषयाचा अर्थ समजतो तो इथेच...मग तो लेख असो वा कविता...मराठी मनाला थंडावा देणारा हां एक प्रकार ... चांगल्या पद्धतीने मांडल्या बद्दल धन्यवाद!!
ReplyDelete