राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥
महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥
पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥
संत तुकडोजी महाराज
अशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.
कविता शोध
माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.
आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/
आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/
Monday, March 16, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
Manapasoon Dhanyawad. Hi kavita vachun junya aathavaninna ujala milala.
आमच्या प्राथमिक शाळेची ही प्रार्थना होती. त्या वयाच्या मुलांना ती समजावी अशी अपेक्षा शाळॆची होती की नाही ठाउक नाही पण लागेल तसा अर्थ लावत मी गायचो.
मृदुला आणि साधक, तुमच्या आठवणी ईथे share केल्यात त्याबद्दल धन्यवाद. या कवितेमुळे [तुमच्या-माझ्याप्रमाणेच] अनेकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असेल. असेच भेट देत रहा आणि आपले अभिप्राय, सुचना, तक्रारी सांगुन हा ब्लॉग आणखी चांगला करण्यास हातभार लावा.
Sunder Kavita aahe. BLog var taklya baddal khup khup dhanyawad
30 वर्षापूर्वीचा पैठणच्या जि. प.शाळेतला अख्ख्या वर्गाचा एकसुरात ही कविता गातानाचा आवाज अजुनही कानात घुमतोय. खरच सांगतो, अर्थ कळत नव्हता -पण गातानाची उत्कटता सच्ची होती. आठवण दिल्याबद्दल शतश: आभारी।
Post a Comment