Monday, October 20, 2008

अंदाज आरशाचा, वाटे खरा असावा

अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा

जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा

नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली
भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा

का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा?
की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा!

काठावरी उतरली, स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा

भेटून वादळाला, इतुके विचार आता
शाबूत एवढाही, का, कोपरा असावा

दारात ती उभी अन्‌, नयनी अबोल अश्रू
लाचार ती असावी, तो, उंबरा असावा

माथ्यावरी नभाचे, ओझे सदा "अलाही'
दाही दिशा कशाच्या, हा, पिंजरा असावा


कवी- इलाही जमादार

6 comments:

  1. dada ,..,..kharikharach ...,..sundar....,kavita ..,.,ahe

    ReplyDelete
  2. hey amit good yaar !bhatanchya kavitan babat kay mat aahe? that are amezing

    ReplyDelete
  3. "जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला
    केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा "




    खल्लास!!!

    हि गझल एकदा ऐकली होती. सुंदर आहे.

    ReplyDelete
  4. i was waiting for this one so long..thank u very much!

    ReplyDelete
  5. माझी सर्वात आवडती गजल

    ReplyDelete
  6. कुणीतरी गजलप्रेमी माझ्या 'मराठी/हिंदी गजलप्रेमी'या व्हाट्सएप गृपला जॉईन व्हावे.नियम हे की,सदस्यांना मराठी किंवा हिंदी गजल रचता यावी.इतर मेसेजेस नको.तसेच सहभाग व प्रतिसाद आवश्यक. चला तर मग, मराठी गजलीस न्याय देऊया. माझ्या 'मराठी/हिंदी गजली'या गृपला जॉईन होण्यासाठी https://chat.whatsapp.com/4N4EX4byqHH12PFNHwUriE या लिंकचा वापर करा.धन्यवाद

    ReplyDelete