तिच्या रंध्रांत मी अद्यापही आहे जरासा
जरी नाहीत भेटी , बोलणे नाही अता
जगाच्या उंबऱ्याला लंघणे नाही अता,
कुणाला ना कळू देताच ती स्मरते मला
मनाचा एक कप्पा राखलेला... आपलासा
कसा दाबून ठेवी हुंदका ती कोण जाणे
कसे ते बंद झाले ओठही शिवल्याप्रमाणे,
कधी बेबंद झाले जर जुने आनंदगाणे
जगाला ऐकु जाई फक्त तो हळवा उसासा
किती पायांत बेड्या घातलेल्या आपल्यांनी
असे जखडून नेले ती जणू की "बंदिनी",
तरी पाहून गेली एकदा मागे वळूनी
मला जगण्या पुरेसा एक तो आहे दिलासा.
कवी - वैभव जोशी
नमस्कार, ही कविता मंगेश पाडगांवकर यांची नसून कवी वैभव जोशी यांची आहे.
ReplyDeleteप्रसाद शिरगांवकर, प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. गडबडीत ही खुप विचित्र चुक झाली आणि चक्क माझ्या लक्षात पण आली नाही! खर तर माझ्या Text File मध्ये वैभवच्या कवितेखालोखाल पाडगावकरांची कविता आहे. ते copy करताना खालच्या कवितेचे कवीपण copy झाले, आणि तशाच गडबडीत मी तेच कवी categorize पण केले [कामाच्या गडबडीत blog post लिहीणे म्हणजे गाढवपणाच]! अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल क्षमस्व आणि ती निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवादही. अशी चुक पुन्हा न होण्याची पुर्ण काळजी ईथुन पुढे नक्की घेईन.
ReplyDeletekhupach chaan.... it's worth a prize
ReplyDeletewww.davbindu.com
कविता अतिशय सुरेख आहे. पण ह्या ओळी तर खरंचच अप्रतिम आहेत.
ReplyDeleteतरी पाहून गेली एकदा मागे वळूनी
मला जगण्या पुरेसा एक तो आहे दिलासा.
वैभव जोशी ना धन्यवाद .