कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Friday, October 17, 2008

तिची का रंगते मेंदी

तिची का रंगते मेंदी नका मागू खुलासा
तिच्या रंध्रांत मी अद्यापही आहे जरासा

जरी नाहीत भेटी , बोलणे नाही अता
जगाच्या उंबऱ्याला लंघणे नाही अता,
कुणाला ना कळू देताच ती स्मरते मला
मनाचा एक कप्पा राखलेला... आपलासा

कसा दाबून ठेवी हुंदका ती कोण जाणे
कसे ते बंद झाले ओठही शिवल्याप्रमाणे,
कधी बेबंद झाले जर जुने आनंदगाणे
जगाला ऐकु जाई फक्त तो हळवा उसासा

किती पायांत बेड्या घातलेल्या आपल्यांनी
असे जखडून नेले ती जणू की "बंदिनी",
तरी पाहून गेली एकदा मागे वळूनी
मला जगण्या पुरेसा एक तो आहे दिलासा.

कवी - वैभव जोशी

4 comments:

Prasad said...

नमस्कार, ही कविता मंगेश पाडगांवकर यांची नसून कवी वैभव जोशी यांची आहे.

अमित said...

प्रसाद शिरगांवकर, प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. गडबडीत ही खुप विचित्र चुक झाली आणि चक्क माझ्या लक्षात पण आली नाही! खर तर माझ्या Text File मध्ये वैभवच्या कवितेखालोखाल पाडगावकरांची कविता आहे. ते copy करताना खालच्या कवितेचे कवीपण copy झाले, आणि तशाच गडबडीत मी तेच कवी categorize पण केले [कामाच्या गडबडीत blog post लिहीणे म्हणजे गाढवपणाच]! अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल क्षमस्व आणि ती निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवादही. अशी चुक पुन्हा न होण्याची पुर्ण काळजी ईथुन पुढे नक्की घेईन.

DavBindu Team said...

khupach chaan.... it's worth a prize

www.davbindu.com

आशा जोगळेकर said...

कविता अतिशय सुरेख आहे. पण ह्या ओळी तर खरंचच अप्रतिम आहेत.

तरी पाहून गेली एकदा मागे वळूनी
मला जगण्या पुरेसा एक तो आहे दिलासा.
वैभव जोशी ना धन्यवाद .