या बाळांनो, या रे या
लवकर भरभर सारे या
मजा करा रे मजा करा
आज दिवस तुमचा समजा
स्वस्थ बसे तोचि फसे;
नवभूमी दाविन मी,
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया
खळखळ मंजुळ गाती झरे,
गीत मधुर चहुबाजु भरे
जिकडे तिकडे फुले फळे,
सुवास पसरे, रसही गळे.
पर ज्यांचे सोन्याचे
ते रावे, हेरावे.
तर मग कामे टाकुनिया
नवी बघा या ही दुनिया
कवी - भा. रा. तांबे
मस्त! चौथीत होती का आपल्याला ही कविता...?
ReplyDeleteआमच्या निंबाळकर बाई आठवल्या....
तुम्हाला "पावसाच्या धारा येती झरझरा , झाकळले नभ सोसाट्याचा वारा....?
मिळेल का कुठे?
मी फार दिवसांपासून शोधत आहे.
हो, शाळेत असताना ही कविता होती. परवा घरुन परतत असताना बसमध्ये एका लहान मुलीला कविता म्हणताना पाहिलं आणि जुन्या कविता post करायचं डोक्यात आलं. जेवढ्या आठवतील, सापडतील तेवढ्या कविता नक्की टाकेन.
ReplyDeleteपावसाच्या धारा येती झरझरा , झाकळले नभ सोसाट्याचा वारा....? शांता शेळकेंची आहे बहूतेक, पण पूर्ण आठवत नाहिये, उद्या मित्रांकडून confirm केल्यावर टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन.
Happy blogging and Keep Visiting. :)
पंख पाचूचे मोरांना,
ReplyDeleteटिपती पाखरे मोत्यांना,
पंख फडकती घोड्यांना ,
मौज दिसे हि थोड्यांना ,
चपळ गती , हरीण किती
देखावे देखावे
तर मग कामे टाकुनिया
नवी बघाया हि दुनिया