अशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.
Monday, December 3, 2007
तू तेव्हा तशी
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी तू बहराच्या, बाहूंची
तू ऐलराधा, तू पैल संध्या चाफेकळी प्रेमाची
तू नवी जुनी, तू कधी कुणी खारीच्या गं डोळयांची
तू हिरवी कच्ची, तू पोक्त सच्ची तू खट्टी मिठ्ठी ओठांची
आरतीप्रभु कवयित्रीचं नाव नाही. ते एक महान कवी होते. कृपया दुरुस्ती करा.
ReplyDeleteमाहिती बद्दल धन्यवाद प्रशांत.
ReplyDeleteदुरुस्ती केली आहे.