Friday, May 29, 2009

अजुनी रुसून आहे...

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ।

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे,
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरीला असा अबोला, की बोल बोलवेना ।

का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे,
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना,
मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना ।

की गूढ काही डाव, वरचा न हा तरंग,
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ।


कवी – अनिल [आ. रा. देशपांडे]

6 comments:

  1. Sweet as the song is, a friend tells me the story of it is even sweeter. Kavi Anil penned this poem when his wife, Kusumavati Deshpande, herself a renowned writer/poet, passed away. It was his statement denying she was gone -- only temporarily away!

    ReplyDelete
  2. No . This poem was written in August 1947 when Kusumavati was very much by his side
    Ulhas Deshpande

    ReplyDelete
  3. No. This poem was written in August 1947, when Kusumavati was very much alive and by his side
    Ulhas Deshpande

    ReplyDelete
  4. मस्तच आहे कविता आणि कुमार गंधर्वांनी तर चार चांद लावले आहेत ती स्वतः गाऊन... http://www.youtube.com/watch?v=RU5j8CksHZU

    ReplyDelete