Thursday, April 2, 2009

पाखरा येशिल का परतून?

पाखरा येशिल का परतून?

मत्प्रेमाने दिल्या खुणांतुन एकतरी आठवून?
पाखरा...

हवे सवें मिसळल्या माझिया निश्वासा वळखून?
पाखरा...

वा‌‌र्‍यावरचा तरंग चंचल जाशिल तू भडकून!
पाखरा...

थांब घेऊदे रूप तुझे हे ह्रुदयी पूर्ण भरुन!
पाखरा...

जन्मवरी मजसवें पहा ही तवचंचूची खूण!
पाखरा...

विसर मला, परि अमर्याद जग राहीं नित्य जपून!
पाखरा...

ये आता घे शेवटचे हे अश्रू दोन पिऊन!
पाखरा येशिल का परतून?


कवी - ना. वा. टिळक.

1 comment:

  1. धन्यवाद मित्रा !!! ही कविता गेली १० वर्ष शोधत होतो. फक्त २ ओळीच काय त्या मला ठाऊक होत्या.
    तुझी कवितांची निवड मला आवडली.

    ReplyDelete