Wednesday, March 25, 2009

कणा

‘ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!


कवी - कुसुमाग्रज

15 comments:

  1. The Best...
    Thansk for uploading this!!!!

    ReplyDelete
  2. धन्यवाद ! शतशः आभार !!

    ReplyDelete
  3. आधी एकदा वाचली होती
    आता पुन्हा वाचली
    माझी जी ईच्छा होती
    ती तू पूर्ण केलीस

    ReplyDelete
  4. Atishay sunder ani kadhihi juni n vatnari kavita...

    ReplyDelete
  5. dhnyawad mitra asha kavitach sfurti detat

    ReplyDelete
  6. marvellous poeam
    thanks for uploading this poeam

    ReplyDelete
  7. Thanks for uploading this poeam...

    ReplyDelete
  8. Khupach sundar ahe hi kavita..........

    ReplyDelete
  9. JUNYA AATVANI JAGYA ZALAYA

    ReplyDelete
  10. फार आवडते मला हि कविता.पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद........

    ReplyDelete
  11. खुप मस्त लिहलेली कविता आहे ही कुसुमाग्रजाने

    ReplyDelete
  12. अतिशय सुंदर, मन हेलावून टाकणारी कविता...
    पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद!!

    ReplyDelete