Monday, March 16, 2009

या झोपडीत माझ्या

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥

महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥

पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥


संत तुकडोजी महाराज

5 comments:

  1. Manapasoon Dhanyawad. Hi kavita vachun junya aathavaninna ujala milala.

    ReplyDelete
  2. आमच्या प्राथमिक शाळेची ही प्रार्थना होती. त्या वयाच्या मुलांना ती समजावी अशी अपेक्षा शाळॆची होती की नाही ठाउक नाही पण लागेल तसा अर्थ लावत मी गायचो.

    ReplyDelete
  3. मृदुला आणि साधक, तुमच्या आठवणी ईथे share केल्यात त्याबद्दल धन्यवाद. या कवितेमुळे [तुमच्या-माझ्याप्रमाणेच] अनेकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असेल. असेच भेट देत रहा आणि आपले अभिप्राय, सुचना, तक्रारी सांगुन हा ब्लॉग आणखी चांगला करण्यास हातभार लावा.

    ReplyDelete
  4. Sunder Kavita aahe. BLog var taklya baddal khup khup dhanyawad

    ReplyDelete
  5. 30 वर्षापूर्वीचा पैठणच्या जि. प.शाळेतला अख्ख्या वर्गाचा एकसुरात ही कविता गातानाचा आवाज अजुनही कानात घुमतोय. खरच सांगतो, अर्थ कळत नव्हता -पण गातानाची उत्कटता सच्ची होती. आठवण दिल्याबद्दल शतश: आभारी।

    ReplyDelete