आठवतं तुला त्या भेटीत
रिमझिम सरींनी छेडलं होतं,
भर दुपारी मला जणू
चांदण्याने वेढलं होतं.
आठवतं तुला त्या भेटीत
श्रावण धुंद बहरला होता,
ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने
ओला देह शहारला होता.
आठवतं तुला त्या भेटीत
दोघे व्याकुळ झालो होतो,
तुझा गंध वेचता वेचता
मीही बकुळ झालो होतो.
आठवतं तुला त्या भेटीत
भावनांनी कविता रचली होती,
माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.
आठवतं तुला त्या भेटीत
आणखी काय घडलं होतं?
मला स्मरत नाही पुढचं
बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं.
कवी - अभिजीत दाते.
भावपूर्ण श्रावण सरींनी भिजलेली कविता .ेहग
ReplyDeleteमाफ कर मित्रा,पण ही जी कविता तू पोस्ट केली आहेस ती संदीप खरे यांची नसून माझी आहे.
ReplyDeleteअर्थात तुला ती संदीपची असावी असं वाटलं ही तिला चांगलं असण्याची मिळालेली पावतीच आहे असं समजतो...!
अभिजीत दाते
http://dilkhulas.wordpress.com
आशाजी, आपण माझा ब्लॉग नियमीत वाचता आणि आपल्याला तो आवडतो आहे हे पाहून फ़ार आनंद झाला. धन्यवाद.
ReplyDeleteओह... माहितीबद्दल धन्यवाद अभिजीत. मी स्वत: जेव्हा पहिल्यांदा ही कविता वाचली [courtesy forwarded mail... :) ]तेव्हा आणि त्यानंतरही काही इतर ठीकाणी ही कविता संदीप खरे यांची आहे असं वाचण्यात आलं. त्यामुळे माझीही गफ़लत झाली, असो चुक सुधारली आहे.
आणि हो, ही कविता मला खुप आवडलेल्या कवितांपैकी एक असल्याने इथे दिली आहे, आणि ही कविता तुझी असेल तर मग आवर्जुन follow करावेत अशा कवींच्या माझ्या यादीत अजुन एका कवीची भर पडली आहे. :) इतक्या सुंदर कवितेबद्दल धन्यवाद.
manala bhedanari kavita ahe....
ReplyDelete