झेलावयास माझी छाती तयार आता
घाला नव्या दमाने तुमचे प्रहार आता
मी एकटाच गातो या उत्सवात माझ्या
माझ्याच गायकीवर माझी मदार आता
विझलो जरी कितीही, मी संपणार नाही
हृदयातल्या आगीशी माझा करार आता
गावात चोरटयांच्या दिवसा प्रकाश नाही
तो सूर्यही जरासा झाला हुषार आता
नाही आता उदासी, नाही आता निराशा
माझ्याच जीवनाचा मी शिल्पकार आता
कवी - प्रसाद शिरगांवकर
फारच छान . तुमची कवितांची निवड नेहेमीच छान असते.
ReplyDeleteधन्यवाद, मराठीत अप्रतिम कवितांची काहीच कमतरता नाही. फ़क्त शोधण्याची ईच्छा हवी. :)
ReplyDeleteमी चांगल्यात चांगल्या कविता ईथे ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय, बघुयात कधीपर्यंत जमतं ते.
धन्यवाद अमित खूप सुंदर कविता जमा केलेल्या आहेत।
ReplyDeleteधन्यवाद अमित।
ReplyDeleteखूप छान छान कविता जमा केलेल्या आहेत।