न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा
डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती
गंजदार पांढर्या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्या शांततेचा निशिगंध
या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा
कवी - बा. सी. मर्ढेकर
वा..काय सुंदर कविता आहे ही. कधी वाचनात आलेली नव्हती आजपर्यंत...मात्र मुंबापुरी आणि गोड हिवाळा हे गणित जमत नाही फारसं नाही...
ReplyDeletecomment बद्दल धन्यवाद सोनल. खरं आहे तुझं म्हणणं, आता मुंबई आणि गोड हिवाळा यांचा मेळ आजिबात बसत नाही. कदाचित जेव्हा मर्ढेकरांनी ही कविता लिहीली तेव्हा जरा वेगळी परीस्थिती असेल. पण ही कविता मात्र लाजवाब आहे आणि माझ्या सर्वात आवडत्या कवितांपैकी एक आहे.
ReplyDeletehi sonal , hi amit
ReplyDeleteAmit mhanto te barobar aahe. pan he khara nahi ki atta he rup pahayla milat nahi. agdich milat nasel pan kahi thikani hivalyatli pahat ashich hote.
amhala 8th ki 9th la hi kavita hoti. kiti cchan varnan kela aahe mumbaicha. garbhavati stree nhahun alyanatar sunder diste.
hi kavita mazhya avdtya kavitanpaiki ek ahe
Amit,
ReplyDeleteThanks for uploading ...
hi..........ya kavitemule punascha ekda shalechi athvan zali.............you really have excellent collection.........thanks a lot for uploading all these poems........
ReplyDeletehe kavita marathi mediumla 10 v chya abhyaskramat hoti. mardhekarani tya kalchya mumbapurich varnan kelay.dnt compare with now..this is 1 of the great poem by him
ReplyDeleteIt remebers my school day..and it feels ki; mi suddha ya hivala madhala muba-puricha ek hissa aahe"
ReplyDeleteग्रेट कविता!
ReplyDelete"मात्र मुंबापुरी आणि गोड हिवाळा हे गणित जमत नाही फारसं नाही"
That's exactly the point! म्हणूनच शेवटचं कडवं.
ही कविता 10 ला होती मला सर्वात जास्त आवडते
ReplyDeletemumbaiachya ह्या रुपाची कलपना करावी जेने करुन मनाची भरारी कळेल
आम्हांला मराठीच्या पुस्तकात होती.खूपछान आहे
ReplyDeleteआम्हांला मराठीच्या पुस्तकात होती.खूपछान आहे
ReplyDeleteAaj achanak aathavli. Net var search keli aani ithe milali. mastach aahe. thank you for uploading.
ReplyDelete