पुन्हा गंध आला तुझ्या मोगर्याला,
पुन्हा जाग आली इथे चांदण्याला...
अशी रात्र जागी झाली पुन्हा की,
पुन्हा जोर आला तुझ्या मागण्याला...
न कळे कसा तोल गेलाच माझा,
पुन्हा धुंदी आली तुझ्या वागण्याला...
जरी संपलेली रात्र वादळांची,
पुन्हा कोण आला तुझ्या आसर्याला...
फूले ही पसरली शेजेवरी मी,
पुन्हा अर्थ आला तुझ्या माळण्याला...
मला जाणले तू असे छान राणी,
पुन्हा दाद घे ही तुझ्या वाचण्याला...
वा
ReplyDeletegood beginning for ayoung poet
ReplyDelete