Wednesday, March 19, 2008

आजही

पेटली ह्रदयात होळी आजही
घेरुनी आली उदासी आजही

कोणत्या जन्मातला संबंध हा
बांधला जातो तुझ्याशी आजही

मी कितीसा वागलो तेंव्हा खरे
चाचणी घेतो मनाची आजही

जन्मलो होतो इथे केंव्हातरी
चालली आहे भ्रमंती आजही

आजही बघतात स्वप्ने तारका
रंगते हातात मेंदी आजही.....

कवी - अनंत ढवळे

4 comments:

  1. छानच आहे गज़ल तुमची .

    ReplyDelete
  2. धन्यवाद, मोरपीस...

    धन्यवाद आशाताई, पण ही गझल माझी नसून श्री. अनंत ढवळे यांनी लिहीलेली आहे. आपल्याप्रमाणेच मलाही ही गझल फ़ार आवडल्याने, मी ती माझ्या कवितासंग्रहात संग्राहित केली होती आणि आज ती इथे ह्या ब्लॉगवर संग्राहित केली आहे.

    आपल्या नियमीत भेटी मला नेहमीच माझा संग्रह इतरांबरोबर share करायची उर्मी देत रहातात. त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

    ReplyDelete