तसा न चंद्र राहिला, तशी न रात राहिली
अजूनही तशीच तू तनामनात राहिली
अजून आठवे मला सुरेख तीळ सावळा
अमीट खूण ती तुझी सखे उरात राहिली
शहारते पुन्हा पुन्हा गळ्यात गीत ते तुझे
मधुर चोरटी मिठी तुझी स्वरात राहिली
कधी कधी हवेत ह्या तुझाच स्पर्श जाणवे
फिरून सावली तुझी जशी घरात राहिली
पुसून लोचने जिथे तुझा निरोप घेतला
अजून ती मनात ह्या तुझी वरात राहिली
कवी - डॉ. श्रीकृष्ण राऊत
('गुलाल आणि इतर गझला' संग्रहामधून)
आपण मुळ कवींची परवानगी घेत असाल व कॉपी राईट भंग होत नसावा ही अपेक्षा.
ReplyDeleteया ब्लॉगवरील जाहिरातीतुन मिळालेले उत्पन्नं मुळ कवींना पोचते का व कसे याचा खुलासा केल्यास बरे होईल.
धन्यवाद.
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. ही गझल मला एका blog वर वाचावयास मिळाली होती, आणि मला ती आवडली म्हणून मी ती इथे post केली आहे. यामागे कोणताही copyright भंग करण्याची इच्छा नाही, म्हणूनच ती मूळ कवीच्या नाव व संग्रहाच्या नावासहीत प्रसिद्ध केली आहे.
ReplyDeleteblog वर येत असलेल्या जाहिरातींचे उत्पन्न कसे जाणायचे हे मला अजुन नीटसे उमगलेले नाही [ह्या जाहीरातीसुद्धा blogspace वर काही नवे page element पहाताना experiment म्हणून टाकल्या आहेत]. गेले काही महिने मी ह्या blog वर त्याबाबतीतच प्रयत्न करत आहे, पण वेळे अभावी याबाबतीत फ़ार काही शिकता आलेले नाही [हे उत्पन्न कोठे पहायचे हे कळले पण ते आपल्याला कसे मिळते हे अजुनही मला नीटसे माहीती नाही.]. यामागे फ़क्त काहीतरी नविन शिकणे हाच हेतू असून पैसे कमावण्याची आजिबात इच्छा नाही.
तरीही जर अशा जाहीराती blog साहित्यविश्वात जर आक्षेपार्ह ठरत असतील तर मी त्या आजच काढत आहे.
अमित,
ReplyDeleteमला असे वाटते की दुसर्या ब्लॉगवर असलेला मजकुर आपल्या ब्लॉगवर उतरवताना शक्यतो मुळ लेखकाची परवानगी घ्यावी. किमान लेखकाच्या नावाबरोबर त्यांच्या ब्लॉगची लिंक द्यावी.
त्याबरोबरच इतरांचे लेखन आपल्या ब्लॉगवर उतरवण्यामागे अभ्यासु किंवा हौशी भुमिका असावी, पैसे कमावण्याचा उद्देश असु नये. कॉपी राईट कायद्याची अशी अपेक्षा आहे.
आपण माझ्या सुचना राईट स्पिरीटमधे घ्याल ही अपेक्षा.
नक्कीच. मला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या, पण आपल्या कडून त्या कळल्यानंतर मी त्याप्रमाणे blog वर बदल केले आहेत, आपणास ते जाणवले असतीलच. तसेच मी कवीला त्याची कविता माझ्या blog वर प्रसिद्ध करत असल्याची कल्पना देण्याचा पुर्ण प्रयत्न करत असतो, इथुन पुढे हा नियम बनवण्याचा [आणि पाळण्याचा :) ] पुर्ण प्रयत्न करेन.
ReplyDeleteमी आणि माझ्यासारखे बरेच लोक काहीतरी नविन शिकण्याचा प्रयत्न म्हणूनच blog कडे पहातात, त्यामुळे आपण करत असलेल्या सुचना मला नक्कीच स्वागतार्ह आहेत. आपण इथून पुढेही असेच मार्गदर्शन करावे [templates कशी असावीत किंवा तत्सम] ही विनंती.
अमित,
ReplyDeleteएक आणखी सुचना म्हणजे प्रत्येक पोस्टला योग्य ते लेबल द्या. सर्च इंजिनमधे याचा वापर होतो. ब्लॉगवाणी सारख्या वेबसाईटवर या लेबल्सचा वापर करून आपोआप वर्गीकरण होते.
http://blogwani.com
उशीरा प्रतिसाद देत असल्याबद्दल क्षमस्व. कामामध्ये व्यस्त असल्यामुळे labels देणं जमत नाहीये. पण नव्या posts ना नक्की label देत जाईन. धन्यवाद.
ReplyDelete