Tuesday, January 15, 2008

शुभ संक्रांत

तिळगुळ घेऊ, तिळगुळ देऊ,
झाले गेले विसरून सारे,
नव्या भास्करा सामोरे जाऊ ॥ध्रु॥

एक दिनकर,अनंत किरणे,
एकची आत्मा,अनंत शरीरे,
एकची सूर सर्वांनी गाऊ ॥१॥

कोण उच्च अन् कोण नीच रे ?
अवघी सारी त्याचीच लेकरे
नित्य त्याचे स्मरण करू ॥२॥

क्षणाक्षणाला काळ हा सरतो
स्मृती तयाची मागे ठेवतो
गोड स्मृतींना उजाळा देऊ ॥३॥


guruvision.in येथुन संग्राहीत.

No comments:

Post a Comment