Wednesday, October 10, 2007

पत्र

पत्रे तिला प्रणयात आम्ही खुप होती धाडली,
धाडली अशी होती की नसतील कोणी धाडली

धाडली मजला तिने ही, काय मी सांगु तीचे
सर्व ती माझीच होती, एकही नव्हते तीचे

पत्रात त्या जेव्हां तिचे ही पत्र हाती लागले
वाटले जैसे कोणाचे गाल हाती लागले

पत्रात त्या हाय ! तेथे काय ती लिहीते बघा
माकडा आरशात आपुला चेहरा थोडा बघा

सार्तथा संबोधनाची आजही कळली मला
व्यर्थता या य़ौवनाची तिही आता कळाली मला

नाही तरीही धीर आम्ही सोडीला काही कुठे
ऐसे नव्हे की माकडाला, माकडी नसते कुठे

कवी - भाऊसाहेब पाटणकर



Technorati Profile

1 comment:

  1. "नाही तरीही धीर आम्ही सोडीला काही कुठे
    ऐसे नव्हे की माकडाला, माकडी नसते कुठे"




    भाऊसाहेबांना हा जो काही आधार देऊन ठेवलाय नाऽऽऽऽऽ आभार मानावे तितके कमी आहेत! :-p


    त्यांचेच दोन मुशायरे आठवत आहेत -

    "लागला धक्का तिचा, जोरात पण होता मऊ,
    ती म्हणे सॉरी मला, मी म्हणालो थॅंक यू!!"

    किंवा -

    "अपुल्याच दाती ओठ अपुला, चावणे नाही बरे,
    चान्स अमुचा अमुच्या समोरी मारणे नाही बरे!"

    ReplyDelete