Tuesday, September 4, 2007

तुला काहीच कसं रे वाटत नाही?

आठवत तुला......

जेव्हा तु उदास असायचीस
एखाद्या दुखा:त खोलवर बुडायचीस
तेव्हा मी तुझ्या ओझरत्या
नजरेकडे पहायचो
ओठावर हसु ठेवत
मी वेड्यासारखा बडबडायचो
तेव्हा वाटायचं मला
की मला आनंदात पाहुन
तु तुझं दु:ख विसरशील
माझ्य़ाकडे पाहुन मोहक हसशील............

पण... तेव्हा तु म्हणायचीस
"तुला काहीच कसं रे वाटत नाही?
एखाद्या वेदनेचे भाव तुझ्या चेह-यावर कसे कधीच दिसत नाहीत?"

पण आता...

जेव्हा तु नाहीस
या डोळयात आसु ठेऊन
मी सारखा तुझा विचार करतोय
वेदनेच्या प्रत्येक पावसात एकटाच भिजतोय
अजुनही मन माझं तोच तो प्रश्न विचारतय
की "तु माझी होशील?"
माझी ही अवस्था पाहुन
उद्या कदाचीत तु परत येशील
तोवर माझे हे आसु पण सुकतील
तुला पाहुन माझे हे
हसु विसरलेले ओठ पुन्हा हसतील
आणि माझ्या त्या हास्याकडे पाहुन

तु पुन्हा तेच म्हणशील

"तुला काहीच कसं रे वाटत नाही
एखाद्या वेदनेचे भाव तुझ्या चेह-यावर कसे कधीच दिसत नाहीत".....

1 comment:

  1. मनातून खोलवरुन आलेले भाव.
    कधीही ह्रद्य़्स्पशींच असतात.
    अगदी ह्या कवीतांसारखे.
    असेच भेटत राहा आमच्या ब्लोग अड्डयावर

    ReplyDelete